जिव्हाळा आश्रमात प्रेमाताई कंठक यांची पुण्यतिथी साजरी.

Share now

Advertisement

पुरंदर(प्रतिनिधी अक्षय कोलते) तालुक्यातील सासवड येथील जिव्हाळा आश्रमात थोर स्वातंत्रसेनानी प्रेमाताई कंठक यांची ३६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.1935साली श्री. शंकरराव देव व प्रेमाताई यांनी सासवड येथे या आश्रची स्थापना केली

Advertisement

आहे.गांधीजींची वर्धा शिक्षण योजना कार्यक्षमतेने राबविण्यासाठी शिक्षिका तयार करण्यात प्रेमाताईंचे विशेष सहकार्य मिळाले होते.
सुंदर इच्छा शक्ती फाउंडेशन संचलित जिव्हाळा आश्रमात हा पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडला.

Advertisement

यावेळी प्रेमाताई कंठक यांच्या कार्याची माहिती सुंदर इच्छा शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीता कोलते यांनी सांगितली व संपूर्ण जीवन प्रवास व स्वातंत्र काळातील दिलेल्या योगदाना बद्दल माहिती सचिव दत्तात्रय कोलते यांनी सांगितली.यावेळी adv.खाडे आण्णा यांनी मार्गदर्शन केले तसेच चिंतामणी विद्यालयाचे प्राध्यापक श्री. मधुकरराव खरात सर आणि ऋषीकेश जगताप हे उपस्थित होते.

Advertisement


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार झुरंगे यांनी केले. अभिषेक पवार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *