पुरंदर मध्ये बिबट्याची दहशत ःः एका वासराला केले ठार ःः वनविभाग मात्र सुस्त

Share now


Advertisement

सासवड ःः पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी या पठारी गावांमध्ये बिबट्याचे दर्शन झाले या बिबट्याच्या दर्शनामुळे अस्करवाडी, दिवे, पागारे या पठार रांगांच्या भागांमध्ये बिबट्याची दहशत दररोज पसरत आहे. यातच नुकतेच बिबट्याने आस्करवाडी येथील शेतकरी शंकर मारुती दौंड यांच्या गीर जातीच्या वासराला ठार  केले. 

Advertisement

      बिबट्याने यापूर्वी दिवे, पांगारे, आस्करवाडी, पठारवाडी,  या डोंगराच्या भागांमध्ये अनेक वेळा शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला केला होता. मात्र वन विभागाच्या गलथान कारभारामुळे बिबट्याला आज पर्यंत जेरबंद करण्यात वन विभागाला कसले यश आलेले नाही. याबाबत मात्र शेतकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

Advertisement

     दौंड यांच्या वासराचा हल्ला झाल्यानंतर अस्करवाडी गावचे पोलीस पाटील मनोहर पायगुडे यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, वनविभागाचे अधिकारी विशाल चव्हाण व शितल बागल यांनी लगेचच घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली

Advertisement

       दरम्यान या परिसरामध्ये बिबट्याचा वावर सातत्याने होत आहे, या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत, वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, बिबट्याचा लवकरात लवकर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. अशी संतप्त प्रतिक्रिया माजी सरपंच परशुराम पायगुडे यांनी व्यक्त केली. 

Advertisement

     या वेळी माजी सरपंच परशुराम पायगुडे, दत्ता दौंड, भिकाजी वाडकर, गणेश कागडे, तानाजी येवले, शंकर दौंड, सोपान दौंड, संदीप दौंड आदी शेतकरी उपस्थित होते, नागरिकांनी रात्री-अपरात्री एकटे फिरू नये, अस्करवाडी व परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे आसे परशुराम पायगुडे यांनी केले आहे. 

Advertisement

      बिबट्या दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण व वनपाल शितल बागल यांनी घटना स्थळांची पाहणी केली आहे. शासकीय नियमानुसार दौंड कुटुंबांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल त्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले,

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *