२९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या ःः शाळेसमोरील झाडाला घेतला गळफास ःः तालुक्यातील घटना

Share now

 

Advertisement

सासवड ःः चांबळी (ता पुरंदर )येथील रहिवाशी गणेश शांताराम कामठे या  २९  वर्षीय तरुणाने गावातील शाळेसमोरील झाडाला गळफास घेतला  असल्याची या घटनेबाबत घडली असून याबाबत सासवड पोलीस स्टेशनला फिर्याद लक्ष्मण एकनाथ कामठे यांनी दाखल केली आहे   

Advertisement

    सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाबळी येथील फिर्यादी एकनाथ लक्ष्‍मण कामठे त्यांच्या राहत्या घरी असताना गावातील काही नागरिक हे सकाळी व्यायामासाठी जात असताना त्यांच्याकडून त्यांना माहिती मिळाली की गणेश शांताराम कामठे वय २९ रा.चांबळी यांने गावातील  श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या  शाळेच्या पुढील बाजूच्या गुलमोहराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

Advertisement

      असे कळविले असता  त्या ठिकाणी जाऊन फिर्यादी यांनी पाहणी केली असता मयत गणेश यांने  नायलॉनच्या रस्सीने  गळफास घेतलेला त्यांना दिसले त्यानंतर   मयत तरुणाच्या आई संगिता शांताराम कामठे यांना फिर्यादी यांनी सदर घटनेबाबत माहिती दिली.  

Advertisement

    सदर मयत तरुण हा तीन वर्षापासून मनोरुग्ण असल्याने त्याने वेडाच्या भरात गळफास घेतला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे . 

Advertisement


  पुढील तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत. दिवाळी पाडव्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *