सासवड पोलीस हद्दितील नागरिकांना जागरुक व सुरक्षित राहण्याचे आवाहन ः आण्णासाहेब घोलप

Share now

Advertisement

सासवड ः दिवाळी सणानिमित्त बाजारात खरेदीसाठी जाताना अंगावरील सोने मौल्यवान वस्तू घालु नका. त्याची योग्य ती काळजी घ्यावी. सोनसाखळी चोरांपासुन सावध रहावे.

Advertisement


ATM व बँकेतुन पैसे काढल्यानंतर पैसे सुरक्षित ठेवावे. पैसे कोणी हिसकावुन अथवा बहाना करुन नेणार नाही. याची दक्षता घ्यावी अश्या विविध घटना घडु शकतात. तेव्हा सासवड पोलीस हद्दितील नागरिकांनी जागरुक व सुरक्षित राहण्याचे आवाहन सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी केले आहे.

Advertisement


आपले वाहनात मौल्यवान वस्तु ठेवु नये. जेणे करुन बँग लिप्टिग अथवा चोरी होणार नाही. ज्यानां शक्य आहे. त्यांनी घराचे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत.

Advertisement


गावातील पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच व तरुण मुलांनी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवावा. त्यामुळे लहान मोठया काही घटना घडल्यास तात्काळ माहिती मिळेल. पोलीस पाटील यांनी पुढाकार घेऊन ग्राम रक्षक दल स्थापन करून त्यांचा पोलिसांबरोबर संपर्क ठेवावा. नागरिकांनी सणानिमित्त बाहेरगावी जाताना शेजारच्या नागरिकांना माहिती देऊन जावे. शेजारचे एकमेकांचे फोन नंबर्स माहिती करुन घ्यावेत. घरात जास्त पैसे किंवा सोन्याचे दागिने ठेवू नये तसेच अंगावर दागिने घालू नयेत ते बँकेत सुरक्षीत लाँकरमध्ये ठेवावेत.

Advertisement


दिवसा अनोळखी व्यक्ती गावात किंवा शेत वस्तीवर भिरताना दिसली तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
आपण केलेला मोठा आर्थिक व्यवहार ईतरांना माहित होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणताही आर्थिक व्यवहार किंवा ईतर खरेदी -विक्री मधून मिळालेले पैसे घरात न ठेवता लवकरात लवकर बँकेत जमा करावे.

Advertisement


सर्वांनी सतर्क राहून आपल्या मौल्यवान वस्तूंची व त्या पेक्षाही मौल्यवान म्हणजे आपल्या जीवाची सुरक्षा करावी. महिलांनी बाजार, गर्दीच्या ठिकाणी, लग्न व ईतर कार्यक्रमाला जाताना कमीत- कमी दागिने घालून जावे.. कारण या ठिकाणी चोरट्यांची नजर दागिन्यावर पडल्यास ते घरापर्यन्त रेकी करीत येवू शकतात.
बतावणी-पुढे पोलिस आहेत. तपासणी चालु आहे. पुढे खुन झाला आहे. तुमच्या अंगावरील सोने काढुन द्या अशी बतावणी करुन फसवणुक केली जाते. अशा व्यक्तीपासुन सावध रहावे.

Advertisement

आपल्याकडील वस्तु कोणालाही काढुन देऊ नये. एकटे फिरु नये. संतर्क रहावे. कोणतीही घटना अथवा माहिती मिळाल्यास खालील फोन नंबरवर किंवा गावचे पोलीस पाटील यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन सासवड पोलिस ठाण्याच्या वतीने सांगितले. संपर्क फोन ः ०२१११५ २२२ ३३३.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *