“त्या” बांधकाम ठेकेदाराकडून महिलेचा विनयभंग

Share now
सासवड (प्रतिनिधी) :  पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका बांधकामाच्या साइटवर  ठेका घेतला होता. परंतु या ठिकाणी कामगार म्हणून काम करणाऱ्या एका मजुराला कुटुंबाला मारहाण केली. असल्याची घटना घडली असून यामध्ये एका कामगार महिलेने यासंदर्भात आरोपी हनुमंत गुंजाळ (रा. रामवडी ता. करमाळा जिल्हा सोलापूर) याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली असून बांधकाम ठेकेदार आरोपी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      याबाबत हकीगत अशी की, सासवड (ता. पुरंदर) येथील भैरवनाथ मंगल कार्यालय येथील बांधकाम कंन्ट्रक्शन साईड वर राहत्या घरी, फिर्यादी महिला आपल्या पतीसह घरी असताना सदर ठिकाणी ठेकेदार हनुमंत गुंजाळ घरी आला. यावेळी माझे पती यांनी गुंजाळ यांचेकडे कामाचे पैसे मागितले असता गुंजाळ याने माझ्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली सदर मारहाण मी सोडविण्यासाठी गेली असता आरोपी हनुमंत गुंजाळ यानी मला तु मधी का आलीस असे म्हणुन मला अश्लील शिविगाळ करुन दमदाटी केली व माझ्या ओढणीला धरुन ओढुन माझा हात पकडुन पिरगाळुन पाठीत बुक्क्यांनी मारहाण करून बाजुला ढकलुन दिले. व माझ्या मनास लज्जा उत्पन्न होईल. असे कृत्य वर्तन आरोपी हनुमंत गुंजाळ यांनी केले. अशी फिर्यादी यांनी सासवड पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. आरोपी विरोधात विनयभंगासह विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस हावलदार ए. यु. पोटे करीत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *