पुरंदरच्या विकासासाठी विजय शिवतारे यांचा छोटा भाऊ म्हणून मी बापुच्या माघे उभा राहील ःः सचिन आहीर पुरंदरेश्वर क्रिकेट क्लबचे उद्घाटन, शिवसेनेचा पक्ष मेळावा, १२०० कोटीचे काय झाले?
सासवड ( प्रतिनिधी ) ः सासवड (ता. पुरंदर) येथे पुरंदरेश्वर क्रिकेट क्लबचे उद्घाटन सोहळा त्याच बरोबर शिवसेनेच्या पक्ष मेळाव्या प्रसंगी सचिन अहिर बोलत होते. यावेळी बोलताना राज्याचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा छोटा भाऊ म्हणून मी बापू तुमच्या पाठीमागे कायमस्वरूपी उभा राहिला. पुरंदर मधील असणार्या विकासकामांच्या संदर्भात देखील आपण दिवाळीनंतर बैठका घेऊन तालुक्यातील जे काही विकासाचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी प्रयत्न करु. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक घेऊन जी काही तुमच्या मनातील पुरंदर ची संकल्पना आहे. ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु. पण काही लोकांना आपण अजून मुख्यमंत्रीपदी आहोत असेच वाटते आहे असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी लावला.
लोकांचा विजय शिवतारे यांच्यावर प्रचंड विश्वास आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व नगरपरिषद या दृष्टिकोनातून पक्षातील कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करणे गरजेचे आहे. विजय शिवतारे यांच्याशिवाय पुरंदरला वैभव प्राप्त होणार नाही. विजय शिवतारे यांच्या पराभवाचा सूड शिवसैनिकांनी घेतला पाहिजे व भविष्यकाळात विरोधकांना धारेवर धरणे गरजेचे आहे असे शिवसेनेचे उपप्रमुख रवींद्र नेर्लेकर यांनी सांगितले.
जलसंपदा व जलसंधारण माजी राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, शिवसेनेला मागच्या निवडणुकीत टार्गेट करण्यात आले. माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात गुंजवणी धरणाचे काम पूर्ण करण्यात आले व राज्यातील सर्व उपसा सिंचन योजनेतील पाणीपट्टी ही औद्योगिक क्षेत्राकडून वसूल करून भरण्यात आली.व शेतकऱ्यांना या सवलतीचा फायदा मिळत होता. परंतु आता पुरंदर उपसा जलसिंचन योजना व जनाई शिरसाई जलसिंचन योजनेचे पाणीपट्टी वाढवण्यात आली आहे. ही शेतकऱ्यांसाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे. स्वर्गीय बापूसाहेब खैरे यांच्या कार्यकाळात देखील पुरंदर मधील अनेक धरणे पूर्ण झाली असल्याची आठवण जनसमुदायाला करून दिली.
गुंजवणीचे काम विद्यमान आमदारांनी आडवले असे अधिकारी सांगतात. स्वतःच्या खिशातून १२०० कोटी रुपयांची योजना पूर्ण करणार होते त्याचे काय झाले याचे उत्तर आधी आमदारांनी द्यावे पुरंदर उपसा सिंचन योजना त्याच बरोबर जनाई शिरसाई योजनेची पाणीपट्टी दुप्पट करून शेतकर्यांना दिवाळी भेट दिली आहे. सासवड नगर परिषदेमध्ये प्रत्येक घरात नगरसेवक पद हे मिळत आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या मार्फत नगरसेवकांचे गाव म्हणून सासवड शहराची ओळख होईल असा टोला तालुका युवा सेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे यांनी यावेळी लगावला.
यावेळी पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, जिल्हा परिषदेचे सदस्य व तालुका प्रमुख दिलीप यादव, ज्योती झेंडे, शालिनी पवार, रमेश जाधव, अतुल म्हस्के, नलिनी लोळे, रमेश इंगळे, दादा घाटे, ममता शिवतरे-लांडे, विराज औटी, दत्तात्रय काळे, अँड. नितीन कुंजीर, माणिक निंबाळकर, गणेश मुळीक, अजित जाधव, छाया सुभागडे, गीतांजली ढोणे, विनोद धुमाळ, उल्हास शेवाळे, प्रशांत वांढेकर, सुरज जगताप, अभिजीत जगताप, कैलास कामठे, हरिभाऊ लोंळे आदी उपस्थित होते.
यावेळी स्वप्नील मोडक, उत्कर्ष कदम, सुषमा पाटील, समृद्धी बनवडे, रंजना वाघमोडे, ऋतुजा मुळीक या खेळाडूंचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
सुरज जगताप यांनी सुत्रसंचालन केले. आभार गणेश मुळीक यांनी मानले.