पुरंदर मिल्ककडून दुध उत्पादकांना बोनस आणि सभासदांना तूप वाटप सुरू

Share now

 

Advertisement

सासवड ( प्रतिनिधी ):-   दिवंगत लोकनेते चंदूकाका जगताप यांच्या संकल्पनेतून पुरंदर मधील शेतक-यांसाठी उभ्या राहिलेल्या ३ हजार ५१० हजार सभासदांच्या मालकीच्या  पुरंदर मिल्क अँड ऍग्रो प्रो लि खळद या संस्थेच्या खळद – गोटेमाळ येथील कोल्ड स्टोअरेजमधे शुक्रवारी ( दि २९ ) दरवर्षीप्रमाणे दुध उत्पादकांना ३५ पैसे प्रतिलिटर बोनस  एकूण ३० लाख रुपयांचा आणि सभासदांना १ किलो तूप वाटपाचा शुभारंभ आ संजय जगताप, संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, संत सोपानकाका सहकारी बँकेचे उपाध्यक्ष रमणिकलाल कोठडिया व संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

Advertisement


    संस्थेला यंदा दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, संस्थेचा पेट्रोल पंप, वजन काटा आणि कोल्ड स्टोरेज मधून ३६ लाखांचा नफा झाला आहे. १० हजार पाचशे हून अधिक गवळी, निरा, गु-होळी, परिंचे, पिसर्वे, भोर आणि माळेगाव ( ता.पुरंदर ) येथे बल्क कुलर आणि ४३ दुध संकलन केंद्रातून यावर्षी जवळपास ७६ लाख ४८ हजार लिटर दुध संकलन केले. एकही दिवस संकलन बंद केले नाही. संस्थेचे भाग भांडवल ५ कोटी, मालमत्ता १०० कोटींची असून स्व चंदूकाका जगताप  घालून दिलेल्या आर्थिक शिस्तीप्रमाणे कामकाज सुरु असल्याचे आ संजय जगताप यांनी सांगितले. 

Advertisement


    संस्थेच्या इग्लू कोल्ड स्टोअरजेजची क्षमता ५ हजार ८०० मेट्रिक टन असून यामधे विविध फळे, फूले, धान्य, पल्प आदी प्रक्रिया केलेले पदार्थ ( – २२ ते +८ अंश सेल्सिअस) नियंत्रित तापमानात साठवून ठेवता येतात. यामुळे पुरंदरसह परीसरातील शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे सीईओ राजेंद्र मांढरे यांनी सांगितले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात ७ गवळ्यांना बोनस वाटप, सभासदांना तूप वाटप करण्यात आले. याप्रसंगी संचालक विठ्ठल मोकाशी, शशिकांत दाते, पै आण्णा कामथे, अविनाश वाघोले, संजय ताकवले, शंकर कड, बाळासो बहिरट उपस्थित होते.  प्रतिनिधी शरद कामथे, चिंतामणी जगताप, तुषार खळदकर, रणजित जगताप आदींनी नियोजन केले.     

Advertisement

     
चौकट… १ नोव्हेंबर पासून महिनाभर तूप वाटपदरवर्षीप्रमाणे भागधारकांना १ लिटर प्रमाणे यंदाही तूप वाटप कारण्यातास सुरुवात झाली असून दि १ नोव्हेंबर पासून पुढे महिनाभर संस्थेच्या खळद येथील कार्यलयातून हे वाटप होणार आहे. यासाठी आधारकार्ड आवश्यक असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. 

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *