एलेक्सिर इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मधे कोविड-१९ लसीकरण संपन्न
Advertisement
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्याचे मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोविड-१९ लसीकरण मोहीम एलेक्सिर इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, पुणे येथे गुरुवार दि. २८/१०/२०२१ रोजी राबविण्यात आली. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, परिंचे, उपकेंद्र - गराडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी आरोग्य विभाग अधिकारी डॉ. नम्रता भंडारे, डॉ.फोले, श्री रोटे तसेच इतर आरोग्य कर्मचारी व महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री सिद्धार्थ गांधी , प्राचार्य श्री.नितीन देशमुख, कार्यक्रम समन्वयक कु. स्वाती पवार उपस्थित होते.
या लसीकरणाअंतर्गत महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
Advertisement
प्राध्यापिका शीतल शेवाळे, ऐश्वर्या जैन, हिना शेख, सोनाली सानप व पल्लवी रणनवरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
Advertisement
Advertisement