आंगणवाडी सेविकांकडुन लेखापरीक्षकाच्या नावाखाली बाराशे रुपयांची वसुली

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) सासवड (ता. पुरंदर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पुरंदर तालुका एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविकांकडून प्रविक्षीकांची जबरस्तीने कामे करून घेतली जात आहेत. हा अन्याय थांबला नाही.

Advertisement

तर दिवाळीनंतर मागील काळात दोन वर्षांपूर्वी प्रत्येक अंगणवाडी सेविकाकडून लेखापरीक्षकाच्या नावा खाली बाराशे रुपयाच जमा केले आहेत. याचे चार ते पाच लाख रुपयांचे जमा केलेले आहेत. मात्र लेखापरीक्षकाच्या नावाखाली अंगणवाडी सेविकांची लूटमार या ठिकाणी प्रकल्प अधिकाऱ्यांनी केली आहे. ही दडपशाही थांबणेसाठी दिवाळी झाली की आंदोलन करण्यात येईल आसा ईशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्या उपाध्यक्ष निलेश दातखिळे यांनी दिला आहे. 

Advertisement

            ते पुढे म्हणाले, या प्रकल्प स्तरावर गेल्या तीन वर्षात केंद्र शासनाने मोबाईल दिले आहेत. पंकजा मुंडे यांच्या काळात हे मोबाईल खरेदी करण्यात आले. ते पॅनासोनीक कंंपणीचे मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. मोबाईलची वॉरंटी संपलेली आहे. मोबाईल गरम होत आसल्याने फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement


        निकृष्ट दर्जाचे मोबाईल परत द्यावेत व नवीन टँब अंगणवाडी सेविकांना द्याावेत. पोषण ट्रॅकर हे इंग्लिशमध्ये आहे. सेविकेचे शिक्षण कमी आहे. त्यामुळे यांना इंग्लिश जमत नाही. त्यामुळे मराठीमध्ये पोषण ट्रॅक्टरचा ॲप द्यावा. कोणत्याही सेविकांचे मानधन कपात करता येणार नाही. मोबाईल घेऊन जाण्याची सक्ती केली जाते आहे. त्यांना नोटिसा काढल्या जात आहेत. त्याला देखील उत्तर देणार आहोत. प्रकल्प अधिकारी हे दडपशाही करत आहेत. असे  दातखिळे यांनी म्हटले आहे. 

Advertisement

     यावेळी पुरंदर तालुका अध्यक्ष छाया भुजबळ, रेखा कांबळे, मंजुळा झेंडे, उर्मिला पोरे, अश्विनी गायकवाड, माया खेडेकर, मुमताज आमीनगड, मंगल कुदळे, ललिता बंड, मेघा काकडे या उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *