शिक्षकांचे प्रश्न विधानसभेत मांडु ःः आमदार संजय जगताप

Share now

Advertisement

पुरंदर ःः पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघ, पुरंदर तालुका स्वाभिमानी शिक्षक समिती, पुरंदर तालुका एकल शिक्षक सेवा मंच, पुरंदर तालुका केंद्र प्रमुख संघटना, पुरंदर तालुका शिक्षक भारती, पुरंदर तालुका कास्ट्राइक संघटना, पुरंदर तालुका महिला आघाडी शिक्षक संघ, पुरंदर तालुका महिला आघाडी एकल सेवा मंच, पुरंदर तालुका जुनी पेन्शन हक्क संघटना या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांची निवासस्थानी भेट देऊन संघाच्या प्रश्नाविषयी चर्चा केली.

Advertisement


तसेच पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनल उभा करणार असल्याची माहिती वरील शिक्षक संघटनाकडूनमाहिती देण्यात आली.
आमदार संजय जगताप यांनी शिक्षकांच्या अनेक प्रश्न बाबतीत प्रश्नासंबंधी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगून आगामी अधिवेशनात शिक्षकांच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा घडवण्यात येईल असे सांगितले

Advertisement


यावेळी शिक्षक नेते राजेंद्र जगताप, प्रताप मेमाणे, तानाजी फडतरे तानाजी झगडे, भानुदास कुंभारकर, गणेश लवांडे, केंद्रप्रमुख सुरेश मोरे, कल्पना निगडे, रजनी पापळ, छाया कुंजीर, राजश्री कुंजीर, मायादेवी दरेकर, विजय पेटकर, सोमनाथ पेटकर, संजीव शेंडकर,संभाजी कुंजीर नवनाथ गायकवाड प्रवीण किरवे गोरख मेमाणे, संजय लवांडे, भगीरथ निगडे, सचिन बोरावके, संजना गोसावी, ललिता नेवसे, संदेश पराळे, सुखदेव मेमाणे, संतोष कामठे, धनंजय जगताप, प्रकाश जगताप, अशोक खेंगरे, दत्तात्रय गायकवाड, हनुमंत कामठे, सुभाष भगत, बाळासाहेब फडतरे, दादासाहेब कटके, संजय शेंडकर, तानाजी रिठे, बाळासाहेब जगताप, किरण जगताप, बाळासाहेब हेंद्रे आदी उपस्थित होते.

Advertisement


कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश लवांडे यांनी केले. तर सूत्रसंचालन भानुदास कुंभारकर यांनी केले. तानाजी फरतडे, कल्पना निगडे, रजनी पापड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर आभार प्रतिभा जगताप यांनी केले.

Advertisement
     परिवर्तन पॅनलचे उमेदवार पुढील प्रमाणे ः  अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून रघुनाथ ठवाळ, एन.टी. मागास प्रवर्गातून गोरक्षनाथ चव्हाण, इतर मागास प्रवर्ग चंद्रकांत जगताप, सर्वसाधारण महिला राखीव वैजंता कुंजीर, रेखा टिळेकर, सर्वसाधारण गटातून राजेंद्र कुंजीर, सुधिर मेमाणे, अनंता जाधव, संतोष कुंजीर, सोपान जगदाळे, संजय जगताप, दत्तात्रय फडतरे, शरद पवार, अजय जाधव उमेदवारी देण्यात आल्याचे आ. संजय जगताप यांना सांगण्यात आले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *