गुंजवणीच्या मार्गात बदल ःः काम बंद पाडण्याचा सर्व पक्षीय बैठकीत निर्णय

Share nowAdvertisement

वाल्हेः  मांडकी (ता. पुरंदर) येथे सुरु असलेले गुंजवणी जलवाहिनीचे काम बंद पाडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. वाल्हे आणि वाड्या वस्त्यावरील संतप्त ग्रामस्थांनी या बाबत  गावात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. सर्वपक्षीय नेत्यांना सहकार्यासाठी आवाहन करण्याचा निर्णय यावेळी ग्रामस्थांनी केला तसेच मांडकी येथे जाऊन जलवाहिनीच्या पर्यवेक्षकांना तसे निवेदन देखील देण्यात आले. 

Advertisement


       गुंजवणी प्रकल्पातील जलवाहिनीच्या मार्गात करण्यात आलेल्या संशयास्पद बदलाचा वाल्हे परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी जाहीर निषेध नोंदवला आहे. 

Advertisement

       राजकीय विरोध बाजूला ठेवून, आपल्या परिसराचे गुंजवणीचे हक्काचे पाणी कसे मिळेल, यासाठी आपण सर्वजण मिळून संघर्ष करू या बाबत या विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंञी विजय शिवतारे, आमदार संजय जगताप यांना बरोबर घेऊन, माजी कृषीमंञी शरद पवार यांना भेटून, या बाबत मार्ग काढू” असे मत या वेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी या वेळी व्यक्त केले.

Advertisement


           पॉवर’फुल लोकांसाठी जलवाहिनीच्या मार्गात केलेला हा बदल धक्कादायक आहे. विद्यमान आमदार हे त्यांचे बाहुले असल्यामुळे ते यात चकार शब्द बोलत नाहीत. शेतकरी वर्गात संताप निर्माण होणं स्वाभाविक आहे. याप्रश्नी माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून वाल्हे व वाड्या वस्त्यावरील लोकांना शिवसेना संपूर्ण सहकार्य करेल. गरज पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावरही ही बाब घालणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे तालुका प्रमुख दिलीप यादव यांनी या बाबत दिली.

Advertisement

       गुंजवणी प्रकल्पात वाल्हे व परिसरातील सर्व वाड्या वस्त्यांचा समावेश करण्यात आला होता. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या वाड्या वस्त्यांना पाणी मिळावं या साठी आडाचीवाडी बापसाईवस्ती मार्गे सर्वेक्षण केलं होतं. 

Advertisement


       आडाचीवाडी, वाल्हे, कामठवाडी, पातरमळा, दातेवाडी, दौंडज, वडाचीवाडी, वागदरवाडी, बहीर्जीचीवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, मोरुजीचीवाडी, पवारवाडी, बाळाजीचीवाडी, दौंडज, पिंगोरी व इतर सर्व वाड्या वस्त्यांपर्यंत जलवाहिनी जाऊन या भागाला सिंचनासाठी पाणी निर्धारीत करण्यात आले. 

Advertisement


        पण २०१९ ला शिवतारे यांचा पराभव झाल्यानंतर योजनेच्या मार्गात बदलाचा घाट घालण्यात आला. बारामतीमधील एका कंपनीने वाल्हे परिसरात घेतलेल्या हजारो एकर जमिनीसाठी हा लपंडाव सुरु असल्याची कुजबुज लोकांच्यात सुरु आहे. 

Advertisement

         या वेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब राऊत, फत्तेसिंग पवार, कॉंग्रेसचे बारामती  लोकसभा मतदारसंघाचे माजी उपाध्यक्ष सचिन दुर्गाडे, महेंद्र पवार, ञिंबक माळवदकर, समदास भुजबळ, शिवसेना निरा गणप्रमुख राहुल यादव आदींनी आपल्या हक्काचे गुंजवणीचे पाणी आणण्या संदर्भात शासन दरबारी संघर्ष करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन शेतकरी वर्गाला केले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *