पुणे पंढरपूर पालखी मार्गावर मोटर सायकल व टँकरच्या अपघातात एकाचा मृत्यू

Share now

Advertisement


वाल्हे (दि.१७) पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावरील वाल्हे जवळ दातेवाडी फाट्याजवळ (ता.पुरंदर) टँकर व मोटारसायकल यांच्या अपघातात वाल्हे येथील एकाचा मृत्यु झाला आहे. तसेच एक व्यक्ती जखमी झाला आहे. 

Advertisement


याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवार (दि.१६) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दातेवाडी फाट्याजवळ हा अपघात घडला आहे. वाल्हे येथील दशरथ सुभाष भुजबळ (वय ४६) व त्यांचे पाहुणे नागेश बबन बारवकर (वय ४२) दोघे त्यांच्या मोटर सायकल क्रमांक (एमएच १२ सी पी ८२००) जेजुरी- नीरा रस्त्यावरून, जेजुरी बाजूकडून नीरा बाजूस जात असताना, दातेवाडी फाट्या जवळ आले असता, ते रस्त्यात उभ्या असलेल्या टँकर  (क्रमांक एम. एच. ४६ बी एफ ३९४६ ) ला पाठीमागून ड्रायव्हरच्या बाजुला धडकले.

Advertisement

यामध्ये नागेश बारवकर यांच्या छातीला जोरदार मार बसला यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जेजुरी येथे रुग्णालयात नेले असता, उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आसल्याची फिर्यादी दशरथ भुजबळ यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. 

Advertisement


याबाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली, वाल्हे पोलिस दुरक्षेञातील पोलीस हवालदार संतोष मदने करीत आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *