जवळार्जुनच्या बुथवर पुढच्या निवडणुकीला काटेवाडीतुन माणसे पाठवतो ःः अजित पवार जवळार्जुनला आमदारकी व सोमेश्वरचे माजी उपाध्यक्षपद दिले.

Share now

Advertisement


 पुरंदर ःः सोमेश्वर सहकारी कारखाना साखर कारखान्याचा गव्हाण पूजन व गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाला त्यावेळी ते बोलताना आजित पवार म्हणाले सर्वाधिक मताधिक्य दिल्याबद्दल सोमेश्वरच्या सभासदांच्या सभासदांचे आभार मानतो पण ते करत असताना ज्या ठिकाणी नेतेमंडळींनी हलगर्जीपणा दाखविला त्याची हजेरी अजित पवार यांनी घेतली

Advertisement


 (पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे व सोमेश्वरचे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुधाकर टेकवडे यांची नाव न घेता) अजित पवार यांनी टोल लावल)

Advertisement

जवळार्जुन गावाला काही कामे केली नव्हती का? कारखान्याचा डायरेक्टर दिला. तरी ही कमी मतदान झाले.  या ठिकाणी माणसं नव्हती सर्वात कमी पन्नास टक्के मतदान तिथे झाले जवळार्जुनच्या लोकांना आणि पुढाऱ्यांना बरीच कामं असतात पुढच्या वेळेला आमच्या काटेवाडी तुन बुथ सांभाळायला माणसं पाठवतो अशा कडक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कमी मतदान झाल्याबद्दल तेथील नेतेमंडळींची वाभाडे काढले. 

Advertisement


     ते म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील नाझरे क.प जेजुरी तसेच बारामती तालुक्यातील शिरसणे आणि मोरगाव येथील बुथवर अत्यंत कमी टक्केवारीत मतदान झाले आहे. जवळार्जुन गावाला तर मागील काळात सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक उपाध्यक्षपद दिले होते सुधाकर टेकवडे यांच्या रूपाने गावाला कारखान्याचे उपाध्यक्ष पद मिळाले होते. पण तेथील बुथ वर लोक नव्हती अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली.

Advertisement


 दरम्यान  मिळालेल्या मता बद्दल मतदारांना त्यांनी चांगल्या कामाची ग्वाही दिली. मला 12 हजाराचे मताधिक्य अपेक्षित होते ती सोळा हजारांनी दिले आहे. ज्यांनी माझ्या वर विश्वास टाकला आहे त्यांच्या कष्टाचे चीज होईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.  मतांच्या वझ्यानी मी वाकल पाहिजे.  सोमेश्‍वर कारखान्याच्या मतदारांचे आभार अजित पवार यांनी मानले.

Advertisement


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते. याप्रसंगी आमदार संजय जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, डॉ. दिगंबर दुर्गाडे, डी के पवार, संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, तुकाराम जगताप उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *