सासवड शहरातून प्रवास करताय सावधान… पोलिसांचा निर्वाणीचा इशारा

Share now

Advertisement

सासवड , ःः ः सासवड ( ता. पुरंदर ) येथे १६ आक्टोंबर रोजी शहरामध्ये वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न सासवड पोलिसाकडून करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून शहरांमध्ये दुचाकीवर ट्रिपल सीट बसून जाणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. 

Advertisement

यात ३१ दुचाकी चालकावरील कारवाईत १६ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी पत्रकारांना दिली.

Advertisement


         सदर मोहीम जयप्रकाश चौक, बस स्टँड हडको,  जेजुरी नाका व नारायणपूर रोड या ठिकाणी वेळ बदलून करण्यात आली. कारवाईमध्ये एकूण ३१ दुचाकी चालकावर कारवाया करण्यात आल्या. त्यांच्याकडून १६ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Advertisement


      सदर कारवाई ही पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार लोणकर, ट्रॅफिकचे पोलीस अंमलदार एस.आर. भिसे, एम.जी. शिंदे, वाय.एस. गरुड ट्रॅफिक वॉर्डन तसेच होमगार्डचे जवान यांच्या मदतीने करण्यात आले..

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *