सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील निवडणुकीत या 12 जागावर विजय झालेले उमेदवार

Share now

Advertisement

सोमेश्वरनगर:  श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलने धुव्वा उडवला असून २० पैकी १२ जागेंवर तब्बल १६ हजार मताधिक्याने विजय मिळवला आहे. अर्ज माघारी नंतर २१ जागांसाठी तब्बल ४६ उमेदवार निवडणूक रिंगणार उभे होते. यासाठी दि. १४ रोजी यासाठी मतदान पार पडले.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र पहावयास मिळते आहे.

Advertisement


     आज सकाळी आठ वाजता बारामती येथील कृष्णाई लॉन्स याठिकाणी ही मतमोजणी सुरू झाली. सकाळी आठ वाजता पहिल्या गटाची मतमोजणीला सुरुवात झाली. सोमेश्वर करखण्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २१  जागांसाठी तब्बल ५३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनेल व भाजप पुरुस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनल आमने सामने उभे होते.

Advertisement

       गट क्रमांक एक ते चार ची मतमोजणी झाली असून असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलचे अभिजित काकडे, लक्ष्मण गोफणे, जितेंद्र निगडे,  ऋषिकेश गायकवाड, पूरूषोत्तम जगताप, राजवर्धन शिंदे, अनंदकुमार होळकर, शिवाजीराजे निंबाळकर, किसन तांबे, सुनील भगत, रणजित मोरे व हरिभाऊ भोंडवे यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. 

Advertisement


      यामध्ये २० हजार ५३३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आज मतमोजणी पार पडत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप पुरुस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनेलला काही मतावरच समाधान मानावे लागेल आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *