दुचाकीला चारचाकी घासली आण् किरकोळ भाडणातुन खुन ःःजिल्ह्यातील प्रकार

Share now


Advertisement

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकीला चारचाकी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून भांडण करत कारमधील तिघांनी तरूणांस हाताने लाथा बुक्क्यांनी व दगडाने मारुन दुचाकी चालकाचा अक्षय अंकुश टिळेकर (वय २१,  रा. टिळेकरवाडी, ता. हवेली ) याचा केला असल्याची घटना उरुळी कांचन – भवरापुर रोडवर बगाडे वस्ती येथे घडली आसल्याची फिर्याद त्याचा मोठा भाऊ अमर अंकुश टिळेकर ( वय २४ रा. टिळेकरवाडी, ता. हवेली ) यांनी तिन अनोळखी इसमांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement


 वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार,  बुधवारी रात्री ८ – ३० वाजण्याच्या सुमारांस अमर घरी असतांना चुलत भाऊ प्रशांत टिळेकर याने अक्षयला बगाडे मळ्याच्या पाटीपाशी तिघे मारहाण करीत असल्याचे कळवले. तो तातडीने चुलत भाऊ धमेंद्र यास घेऊन घटनास्थळी पोहोचला. तेथे लोक जमा झाले होते. त्यावेळी अक्षय यास मारणारे तिघे कारमध्ये बसताना अमरने पाहिले. ते भवरापुरचे दिशेने निघून गेले. त्यावेळी अमरसह काही जणांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. गाडी वेगात गेल्याने त्यांना थांबवता आली नाही. त्यानंतर अमरने लोकांकडे विचारपूस केली. 

Advertisement

   अक्षय रस्त्याच्या कडेला निपचीत पडला होता. त्यांस रूगणवाहिकेतून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचन येथे नेले. तेथे सुविधा नसल्याने खाजगी रूग्णालयात नेण्यात आले. सदर ठिकाणी तपासणी करुन डॉक्टरांनी अक्षयचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार हे करत आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *