एकाच जमिनीची दोनदा विक्रीःः पुरंदर मधील कारभार चव्हाट्यावर

Share now

Advertisement

सासवड – सासवड (ता. पुरंदर) येथील दुय्यम निबंधक (नोंदणी) कार्यालय येथे 20 जुलै रोजी व्यवहार व नोंद झाली. मौजे कर्नलवाडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील गट क्रमांक 46 मधील एकुण 19 एकर 20 गुंठे एवढे क्षेत्र या प्रकरणातील फिर्यादी कामाजी सिध्दु हाके यांनी करंजे (ता. बारामती) येथील काही महिलांना विकले होते. तरी तलाठी व सहायक निबंधक (नोंदणी) यांना हातशी धरुन पडवी गावच्या तिघांनी ही जमिन कागदपत्रांवर खाडाखोड करुन पुन्हा खरेदी केलेली दाखविली आहे., 

Advertisement

    याबाबत कामाजी सिध्दु हाके (वय 45, व्यवसाय शेती व मेंढपाळ, रा.चौधरवाडी ता.बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार या गुन्ह्यातील आरोपी किरण लक्ष्मण जगताप, नंदकुमार टेंगले, संजय टेंगले (सर्व रा. पडवी, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement


       फिर्यादी जबाब पुढील प्रमाणे, कामाजी सिध्दु हाके हे जमिनीचे मुळ मालक व या प्रकरणातील फिर्यादी असून त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की., मौजे कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील गट क्रमांक 46 मधील 19 एकर 20 गुंठे हे क्षेत्र मी स्वतः श्रीमती शोभा राजेंद्र वाघमारे, सौ. माया राजेंद्र गायकवाड, सौ. शोभा अभिजीत डोंगरे व सौ. वृषाली स्वप्नील हुंबरे (सर्व रा. करंजे, ता. बारामती) यांना पूर्वीच विकलेले होते. 

Advertisement


      मात्र त्यानंतर किरण लक्ष्मण जगताप, नंदकुमार टेंगले, संजय टेंगले (रा. पडवी, ता. दौंड) यांनी कर्नलवाडीच्या गावकामगार तलाठ्यास तसेच सासवडच्या दुय्यम निबंधक कार्यालयास हाताशी धरून किंवा त्यांच्याशी संगनमत करून 7/12 (सात – बारा) उता-यावर खाडाखोड व बदल करून सदरचे हे संबंधीत क्षेत्र.. हे पुनर्वसनासाठी व लाभक्षेत्रासाठी राखीव असतानाही, त्यासाठी लागनारी शासनाची कोणतीही परवानगी न घेता., सदरचे जमीन क्षेत्र खरेदी करून घेतले

Advertisement


       माझी संमत्ती नसताना, हे जमीन क्षेत्र खरेदी करून.. किरण लक्ष्मण जगताप, नंदकुमार टेंगले, संजय टेंगले यांनी माझी संगनमताने फसवणुक केली. म्हणुन माझी त्यांच्या विरूध्द माझी फिर्याद आहे. याबाबत पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्दर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुप्रिया दुरंदे या तपास करीत आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *