प्लॉटिंग साठी नैसर्गिक प्रवाह बदलणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी ःः पुरंदर तालुक्यातील घटना

Share now


Advertisement

सासवड (प्रतिनिधी) सुपे खुर्द ( ता. पुरंदर ) येथील गाव हे किल्ले पुरंदर कडुन जाणाऱ्या डोंगर रांगाच्या पायथ्याला असल्याने येथे नेहमीच जास्त प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असते. ओढ्यांच्या उगमावर असलेल्या घोरवडी धरणामुळे या ओढ्याला कायम पाणी असते. हा प्रवाह पुढे क-हानदी पात्राला जात असल्याने हा ओढा सिंचनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. 

Advertisement

    मौजे सुपे खुर्द ( ता. पुरंदर ) येथील गट नंबर १२, ७३५, ७९६, ७९७, ७९८  या गटातून जाणारा हा परंपरागत ओढा संबंधित कब्जेदाराने पॉल्टीग करून विकण्यासाठी परंपरागत ओढा पूर्णपणे बुजवण्याचे ग्रामस्थांनी सांगितले आसल्याने व सोशल मीडिया मार्फत केलेल्या तक्रारीनुसार केलेल्या व समक्ष स्थळ पाहणीत निदर्शनास येत आहे. सदर विकसिक करताना संबंधित विकासकाने पी.एम.आर.डी.ए, पाटबंधारे विभाग, तहसील कार्यालय, पर्यावरण विभाग व भुमिअभिलेख इत्यादी कार्यालयाची शासकीय परवानग्या किंवा ना हरकत दाखले घेतले आहेत काय ? घेतली असल्यास कोणत्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे का.  

Advertisement

       सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून परंपरागत उघड्यावरील अतिक्रमण दूर करून नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह सुरळीत करावा. तसेच स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाव्दारे आमदार संजय जगताप यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *