देवांंना ४३ तोळ्यांचा सुवर्णाहार अर्पण

Share now

Advertisement

सासवड ःः संपूर्ण राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र कोडीत येथील श्री नाथ म्हस्कोबा देवस्थान वतीने घटस्थापनेच्या सातव्या माळ्याच्या शुभमुहूर्तावर ४३ तोळ्याचा सुवर्णहार बनविण्यात आला. हा सुवर्णहार आज श्रीनाथ म्हस्कोबा देवांना अर्पण करण्यात आला. 

Advertisement

    सुवर्णहाराची वाजत गाजत फुलांच्या पायघड्या घातलेल्या मार्गाने मंदीर प्रदक्षिणा झाली. वेळी “नाथ साहेबांचे चांगभलं” गजर करीत फुलांची व गुलालाची उधळ करण्यात आली. त्यानंतर सर्व धार्मिक कार्यक्रम होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीनाथ महाराज महिला ग्रामसंघ यांच्या वतीने नाथ म्हस्कोबा मंदिरात फुलांची सजावट व रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. श्रीनाथ सेवा युवक मंडळाने मिरवणुकीत आपले खेळाचे सादरीकरण केले.   

Advertisement

         सुवर्णहाराची मिरवणूक रथातुन सकाळी एसटी स्टँड पासून सुरु करण्यात आली. यावेळी रस्त्यावर रांगोळी, फुलांचे सजावट करून. ही मिरवणूक नाथांचे देवघर व भैरवनाथ मंदिर येथे आल्यानंतर येथे मंदिर प्रदक्षिणा घालून नंदी चौकातुन गावच्या माळावरील मुख्य म्हस्कोबा मंदिरात मिरवणूकीने गेली. या मिरवणुकीत महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. तर आज नवरात्रात लाल रंग असल्यामुळे लाल रंगाच्या साड्या घातल्या होत्या.

Advertisement

              याठिकाणी सुवर्ण मंदिरामध्ये प्रवेश करून धूप आरती झाली. तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *