सासवड शहरातील विनापरवाना व्यावसायिकावर नगरपरिषद करणार कारवाई

Share now


Advertisement

सासवड (प्रतिनिधी)सासवड शहरातील सर्व व्यवसाय धारकांना सासवड नगर परिषदेच्यावतीने ज्या कोणी व्यवसायिकांनी नगरपरिषदेचा व्यवसाय परवाना घेतला नसेल किंवा नूतनीकरण केले नसेल अशा व्यावसायिकांना नोटीस देऊन पाच दिवसांची मुदत देण्यात आली होती नंतर नगर परिषदेच्यावतीने दुसऱ्यांदा ना हरकत प्रमाणपत्र देणेबाबत समज देण्यात आलेली होती परंतु अद्याप कोणी ना हरकत प्रमाणपत्र घेतले नसतील किंवा नूतनीकरण केले नसेल अशा व्यावसायिकांची त्वरित प्रमाणपत्र किंवा नूतनीकरण करून घ्यावे अन्यथा सासवड कायदेशीर कारवाई करून व्यवसाय बंद करण्यात येईल असे सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखील मोरे यांनी सर्व शहरातील व्यवसाय धारकांना आवाहन केले आहे.

Advertisement

      त्यानुसार सासवड नगर परिषदेच्या वतीने मोहन चव्हाण उत्तम सुतार सुमित काशीद संजय पवार यांचे पथक तयार करण्यात आले असून त्यांना कार्यादेश देऊन त्यांच्या मार्फत कार्यवाही करण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत यामध्ये ना हरकत प्रमाणपत्र घेतलेच घेतलेले घेतले चे आढळून आल्यास किंवा नूतनीकरण केल्याचे निदर्शनास न आल्यास व्यवसाय बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल याची सर्व व्यवसायिक धारकांनी नोंद घ्यावी.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *