“त्या” सोमेश्वर विकास पॅनेलच्या उमेदवाराला निवडणुकीत प्रतिबंध घालावा

Share now

Advertisement


       सोमेश्वर ःः श्री सोमेश्वेर सहकारी साखर कारखाना निवडणूक उमेदवारी अर्ज भरुन झाल्यानंतर व त्यानंतर माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समोरा समोर मी 2 पॅनल उभे आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलचे भटक्या जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातील उमेदवार आनंद विनायक तांबे रा. जेऊर ता पुरंदर यांना श्रेयस अनंत तांबे वय २१ पायल अनंत तांबे वय १९ यशराज अनंत तांबे वय १४ जन्म दिनांक ०१/०९ /२००७ चे तीसरे अपत्य असल्याने त्यांना निवडणूक लढविण्या पासून प्रतिबंध करावा अशी मागणी भटक्या जाती जमाती मागास प्रवर्ग प्रवर्गातील उमेदवार आदिनाथ सोरटे यांनी केली आहे.

Advertisement

        उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननी २३ फेब्रुवारी २०१९ रोजी पार पडली व नंतर पुन्हा स्थगिती झाली. सदर कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ मधील नियम ०७ कोणत्याही व्यक्तीला तिसरे अपत्य असल्यास ती व्यक्ती निवडणूक लढण्यास अपत्र आहे.

Advertisement


     या निवडणुकीमध्ये भटक्या जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना उमेदवारी अनंत विनायक तांबे रा. जेऊर ता. पुरंदर जि. पुणे यांना  तिन आपत्या संदर्भात रेशन कार्डची छायांकित प्रत या अर्जासोबत जोडली आहे. उमेदवाराकडून खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले असून महाराष्ट्र सहाय्यक निबंधक अधिनियम १९६० मधील तरतुदीनुसार उल्लंघन होत असून अनंत विनायक तांबे यांनी निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करावा व सदर निर्णय हा निवडणुकीत भटक्या-विमुक्त मागास प्रवर्गातील उमेदवारांना निवडनुकीत पात्र करावे असा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *