दादाच्या सभेपूर्वी वाघळवाडी वादग्रस्त बॅनर काढला

Share now


सोमेश्वर ःः वाघळवाडी (ता. बारामती) येथे आज दादा हे सांगता सभेसाठी येणार आहेत. वाघळवाडी येथे येणार होते. वादग्रस्त बॉनर लावण्यात आले होते. ते काढुन टाकण्ययात आले आसल्याने आणखीनच नाराजी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Advertisement

 वाघळवाडीतील  नाराजांनी लावलेला बॅनर दादांच्या सभेच्या काही तास आधी परस्पर काढून घेण्याच्या प्रकारणामुळे वाघळवाडीतील नाराजी वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला आमच्या जमिनी फुकट पाहिजेत, आमचे मत पाहिजेत  बर कारखान्यांमध्ये संस्थेमध्ये काम करण्यासाठी भूमिपुत्र नकोत, भूमिपुत्रांना संधी दिली जात नसल्याने नाराजांनी बॅनर बाजीतून आपला विरोध दाखवत संघर्षाला तोंड फोडले आहे.

Advertisement


  गावाने एकत्र येऊन बहिष्काराचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर का ही कारखान्यात हितसंबंध गुंतलेल्या मंडळींनी सगळे काही आलबेल असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत बॅनर काढून घेतले. मात्र याचा कसलाही परिणाम वाघळवाडी तील तरुणांच्यात झाला नाही. आणि मुख्य रस्त्यावरील बॅनर तरुणांनी पाठवण्यास मनाई केली. आज दादांच्या सांगता सभेसाठी येण्यापूर्वी तरुणांना विश्वासात न घेता सदर बॅनर काढण्यात आल्याने तरुणवर्ग आणखीनच नाराज झाला. याचा थेट परिणाम गावच्या राजकारणावर आगामी काळात नक्कीच दिसणार असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होते आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *