“पुरंदरचे कोहिनूर” नामदार दादासाहेब जाधवराव. शब्दांकन कवी. राजेंद्र सोनवणे ९८८१६११३७८

Share now

Advertisement

 दिवे घाट ओलांडला की स्वागतास पुरंदरची गोड मधूर प्रसन्न हवा अंजीर सीताफळाच्या बागा जशा सज्ज असतात अगदी तसेच सज्ज असते दादासाहेब जाधवराव यांचे ‘समाजवादी’ साम्राज्य… या समाजवादी लोकनेत्याने अर्धे शतक पुरंदरच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळावर एक हाती राज्य केले…

Advertisement


ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य सहा वेळा पुरंदरचे आमदार ते कृषी राज्यमंत्री असा दादासाहेब जाधवराव यांचा जीवन प्रवास कुणालाही हेवा वाटावा असाच आहे.
ऐतिहासिक जाधवगड या इतिहासाचा आजही साक्षीदार म्हणून उभा आहे. दादा जाधवराव यांचे साम्राज्य लोकांच्या हृदयावर राज्य करणारे होते. तसे संस्थानिक पिलाजीराव जाधवराव यांचे वंशज असणारे दादासाहेब जाधवराव हे संस्थानिक देखाव्याची झुल कधी आपल्या अंगावर बाळगून जगलेच नाहीत…

Advertisement


लोकांच्यात मिसळून जगण्याचे एकमेव व्यसन दादासाहेब जाधवराव यांनी आयुष्यभर जोपासले… लोकांच्या सुख दुःखात दादा व्यक्तिशः हजर राहत लग्न, मयत, आणि दहावा दादांनी क्वचितच कुणाचा चुकवला असेल. दादांची केवळ उपस्थिती त्यांच्या कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ देत असे…

Advertisement


महाराष्ट्रात देखील हा पायंडा पुढे रूढ झाला केवळ आपण पण मैतीला आणि दहाव्याला उपस्थित राहिलो तर आपण देखील आमदार होऊ शकतो अशी अनेकांना स्वप्ने पडू लागली…
कुणाच्याही झोपडीतला काळा चहा दादांनी नाकारला नाही.एकदा एका गरीब म्हातारीने दादां साठी गडबडीत काळा चहा केला बिचारी साखर टाकायची विसरली दादासाहेबांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता चहा पिला आसपासचे कार्यकर्ते गडबडले..नंतर या बिचारीच्या ते लक्षात आले. ती शरमुन दादां कडे गेली व आपली साखर न टाकल्याची भावना व्यक्त करू लागली

Advertisement

त्यावर दादासाहेब म्हणाले अरे मीच तुला सांगितले होते. पण तू ऐकले नाहीस असे वाटते कारण डॉक्टरांनी मला सांगितले आहे बिन साखरेचा चहा प्या म्हणून मला शुगर आहे. अर्थातच हे खोटे होते. नंतर दादा आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले,”कुणीतरी प्रेमाने बनवलेला चहा त्यात साखर नसली तरी तो गोडच असतो..
दादांनी संपूर्ण तीस वर्षे केवळ या गोडव्याने कायम सत्तेच्या विरोधात निवडून येण्याचे काम केले. महाराष्ट्रात पुरंदर आणि दादासाहेब जाधवराव हे समीकरण एक जीव झाले होते. दादांना कार्यकर्ते कुठेही भेटू शकत असत भेळीच्या दुकानात, चहाच्या टपरीवर अगदी कुठेही..

Advertisement


दादांची राहणी आणि जगणे ही साधेच होते चंगळ वादाला दादासाहेबानी कधीही आसरा दिला नाही आणि गर्भ श्रीमंतीचा दर्प ही कधी त्यांनी कधी आपल्या व्यक्तिमत्वाला स्पर्श करू दिला नाही. दादासाहेब हे स्वयंभू ताऱ्या सारखे प्रकाशित होत राहिले.बऱ्याच जणांनी त्यांची कॉफी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची झेरॉक्स जनतेच्या नजरेतून सुटू शकली नाही.

Advertisement


दादासाहेबानी जनता दल सेक्युलर चा झेंडा शेवट पर्यंत सोडला नाही. पंतप्रधान व्ही.पी.सिंग केवळ दादासाहेब जाधवराव यांच्या आग्रहा खातर पुरंदरला येऊन गेले.. दादासाहेबाचे राजकारण उजव्या अंगाने कधीही गेले नाही. विकास निधी ची भाषा दादांची भाषाच नव्हती तरीही दादासाहेबाना एक हाती हा पुरंदर निवडून देत राहिला…

Advertisement


नंतरच्या आधुनिक राजकारणाची गणिते दादांना फारशी जमली नाहीत.पुरंदरची भाकरी तीस वर्षे खरुपूस भाजून फिरवली गेली… …पण याच दादांच्या वैचारिक भाकरीने पुरंदरला अनेक नेतृत्वे दिली प्रत्येकाने आपापल्या परीने संसार देखील थाटले…

Advertisement


असे असले तरी पुरंदरचा राजकीय इतिहास दादांन शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. दादा हे दादाच होते.दादासाहेब एक विचार होते.ते चालत राहिलेल्या पायवाटेवर एक हमरस्ता निर्माण झाला…
दादासाहेब आज राजकीय जीवनात सक्रिय नसले तरी जाधवगड ची शान तसूभरही कमी झालेली नाही… काळाच्या वादळात जुन्या साम्राज्याच्या खुणा ही आपले अस्तित्व टिकवून असतात…

Advertisement


पुरंदरच्या या “कोहिनूर” रत्नास आदराचा विनम्र मुजरा माझ्या या लेखाच्या माध्यमातून समर्पित करून आपली रजा घेतो. शब्दांकनकवी.राजेंद्र सोनवणे९८८१६११३७८ “पुरंदरचे कोहिनूर”
या आगामी पुस्तकातील काही अंश…

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *