११ ऑक्टोबरला पुरंदर बंद

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशातील शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी केंद्रातील मोदी सरकार कडे शांतपणे आंदोलन करून आपले म्हणणे सरकारकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण हे आंदोलन भाजप सरकारकडून वेळोवेळी दाबण्याचा प्रयत्न करण्यात करीत आहे परंतु याला त्यांना पूर्ण यश आलेले नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन साम, दाम, दंड भेद वापरून देखील संपत नसल्यामुळे दहशती द्वारे शेतकऱ्यांना संपण्याचा गाठ आता भाजप सरकारने चालवला आहे. यासंदर्भात पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माणिकराव झेंडे, पाटील काँग्रेस कमिटीचे पुरंदर तालुका अध्यक्ष प्रदीप पोमन, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Advertisement

पत्रकात पुढे म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील लखीमीपुरखैरी या गावातील शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने गाडी खाली चिरडून मारण्याचा प्रकार हा अत्यंत निर्दयी व तीव्र चिरफाड आणणार आहे. भारत हा कृषिप्रधान देशात असताना देशातील शेतकऱ्यांना अशी वागणूक दिली जाते. याबद्दल प्रचंड संताप आहे. अशा वेळी महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी मिळून शेतकऱ्यांच्या हत्या करणाऱ्या भारत सरकारचा निषेध केला पाहिजे व शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

Advertisement

या कृत्याचा निषेध म्हणून महा विकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या वतीने सोमवार दिनांक ११ ऑक्टोंबर २०२१ रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. शांततेच्या मार्गाने कायदा हातात न घेता पोलीस यंत्रणेची संघर्ष न करता पुरंदर तालुका बंद करण्यात येत आहे. मृत्युमुखी पडलेले शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून केंद्र सरकारच्या या कृत्याने निषेध करीत आहोत तसेच अजित दादा पवार यांच्या नातेवाई यांच्यावर सूड बुद्धीने केलेले कारवाईचा निषेध करत आहोत. आसे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *