सासवड शहराचा वीजपुरवठा सुरळीत करा शिवतारेंनी खडसावले

Share now

Advertisement

सासवड ःः गेल्या दोन तीन आठवड्यापासून सातत्याने खंडित होत असलेल्या सासवडच्या वीजपुरवठ्यावरून माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महावितरणला चांगलेच खडसावले. तीन आठवडे हा प्रकार सुरु असताना गप्प का बसलात ? ताबडतोब वीजवितरण नियमित करा अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरं जा असा इशारा शिवतारे यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे. 

Advertisement

लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी विजेचा हा खेळखंडोबा शिवतारे यांच्या निदर्शनास आणून दिला. अधिक माहिती घेतली असता सगळ्या शहरात असाच बट्ट्याबोळ सुरु असल्याचे लक्षात आले. कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांना तत्काळ संपर्क करीत शिवतारे यांनी जाब विचारला. तीन आठवडे हा प्रकार सुरु असताना महावितरणचे अधिकारी काय करत होते असा सवाल करीत शिवतारे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. नागरिकांचा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. व्यवसायांवर सुद्धा याचा परिणाम जाणवत असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.   

Advertisement

       आमदारांनी निदान गावात तरी लक्ष द्यावं  

Advertisement

सासवडकरांनी आमदारांना भरभरून मतं दिली पण आमदारांचं गावात किती लक्ष आहे ते अशा समस्यांवरून दिसतं. सासवडला पाणीपुरवठ्याची बोंब, रस्त्यांची चाळण आणि विजेचा असा खेळखंडोबा सुरु आहे. आमदारांना तालुक्यासाठी काही करता येत नाही निदान गावात तरी त्यांनी लक्ष द्यायला हवं असा टोला शिवतारे यांनी लगावला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *