केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी अजितदादांच्या वर कारवाई करण्याचा भाजपाचा प्रयत्न ःः नंदूकाका जगताप

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) आमचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आजित पवार यांच्यावर केलेली कारवाई ही केद्र सरकार आपले अपयश झाकण्यासाठी चाललेले प्रयत्न आहेत. त्याचबरोबर राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाला स्वप्ने पडत आहेत. त्याला अनुसरून ही कार्यवाही केल्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचे मत आहे. एक दुःख मला या ठिकाणी सांगा असं वाटतं महाविकास आघाडीचे नेते म्हणून आमचे आजितदादा काम करत असताना विकास झाला पाहिजे मला आजितदादांनी निधी दिला असे सांगणारे आघाडीतील काही नेते मंडळी सुद्धा याबद्दल काही बोलत नसतील तर याचं दुःख झाल्याशिवाय राहत नाही. आसे निरा कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती नंदकुमार जगताप यांनी सांगितले.

Advertisement


       नंदूकाका जगताप पुढे म्हणाले,  काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून शेवटी एकत्र कुटुंबामध्ये शिवसेना-राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय काँग्रेस पक्ष असेल भाऊ भाऊ म्हणून काम करत असताना एखादे संकट आले तर दुसऱ्याने धावून जाणं ही आपली संस्कृती आहे. आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो आजितदादा बाहेर पडतील कारण सर्वसामान्य माणसासाठी पहाटे साडे पाच वाजल्यापासून रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत काम करणारा आमचा नेता या नेत्यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जो त्यांना आशीर्वाद आहे. त्यातून सहीसलामत बाहेर येतील. 

Advertisement


        सरकारने काय कारवाई चालू केली असली तरी माझा सर्वसामान्य माणूस हीच माझी खरी संपत्ती आहे. आणि तो सर्वसामान्य माणूस त्यांच्या आशीर्वादामुळेच मी सहीसलामत बाहेर पडेल आणि असल्या आरोपांना बळी पडणार नाही. सर्वसामान्य जनता जनार्दन यांचा पाठिंबा यातून मला निश्चितपणे तारून नेईल ही भूमिका आजित पवार यांनी मांडली आहे. 

Advertisement


        पुणे जिल्ह्याचे आमचे पालक मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वर केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ज्या काही चौकशा त्याठिकाणी चालू केलेले आहेत त्या पाहिल्या नंतर अतिशय मनाला वेदना झाल्या. गेली चाळीस वर्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांची दिशा घेऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे.

Advertisement


      राजकारणामध्ये अनेक स्थित्यंतर होत असतात वैचारिक मतभेद होत असतात आणि त्याला अनुसरूनच गेली दहा वर्षांपूर्वी मी काँग्रेस पक्षाचे काम त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यात करतोय परंतु शरद पवार यांच्या विचाराची दिशा घेणारा माझ्या सारख्या कार्यकर्त्या आहे.  शरद पवार साहेब ज्या पद्धतीने या राज्यांमध्ये या देशांमध्ये राजकारण करतात. अनेक विरोधी पक्षाचे नेते सुद्धा साहेबांना आपले म्हणतात. किती जरी चौकशा केल्या तरी त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.

Advertisement


         परंतु देशातल्या आणि राज्यातल्या लोकांचे लक्ष विचलित करण्याची भा.ज.प सरकारची रणनीती आहे. त्याला अनुसरूनच गेली दोन वर्ष महाराष्ट्रामध्ये महा विकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना दोन वर्षांमध्ये आपल्या हातात काही लागत नाही. आणि यातून नाराज होऊन हे सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घातले सर्व भाजपचे नेते यांच्या हाताला काहीही न लागल्यामुळे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यावर त्यांनी आरोप आणि त्यांची चौकशी करण्याची भूमिका घेतलेली आहे. ही अतिशय निंदनीय अशी आहे.

Advertisement


  शरद पवार साहेबांचा विचारा कुठल्याही नेत्यांनी कार्यकर्त्यांनी विचारांचा सामना विचारांनी करावा हि निती मला संस्कृती साहेबांनी मला शिकवलेली आहे. आणि शरद पवार साहेबांच्या वर सुद्धा खैरनार असेल अशा अनेक जणांनी आरोप केले. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. खरं सत्य जनतेपुढे त्या काळातही आले. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा आदरणीय पवार साहेबांना सत्ता गमवावी लागली. परंतु त्याचे दुःख साहेबांना झालं नाही.

Advertisement


         गेली पन्नास वर्षे शरद पवार या बारामतीच्या नव्हे, पुणे जिल्ह्याच्या नव्हे, तर संपूर्ण देशाच्या लोकांच्या साठी अहोरात्र कष्ट करणार आहे. हे नेतृत्व देशाचे संरक्षण मंत्री असो किंवा कृषिमंत्री सांभाळत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी अहोरात्र काम करणारे किंवा खासदार सुप्रियाताई सुळे असतील ते आदिवासी मुलांसाठी असतील शिक्षणाची व्यवस्था असेल गरिबांसाठी शिक्षणाची व्यवस्था असेल त्यांना काही आर्थिक मदत करायची वेळ असेल त्या महाराष्ट्रातल्या मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यालया करण्याची भूमिका असेल किंवा त्यांना शाळेत येण्यासाठी सायकल देण्याचा प्रयोग असेल जेणेकरून या महाराष्ट्रातल्या मुली शिकल्या पाहिजेत.

Advertisement

सोमेश्वर कारखान्याच्या बाबतीत माझ्यासारख्या निकाल माझी नाराजी वेगळ्या पद्धतीने व्यक्त केली. परंतु शेवटी मानसाने भांडता आसाव पण बुडत नसावंत या भूमिकेतून मि काम करीत आसतो. पुणे जिल्ह्याचे मानाचे स्थान टिकवण्यासाठी घरगुती काहीही झाले असले तरी ते बाजूला ठेवून आजित दादाच्या आडचणीत उभा राहणे हे मी माझे कर्तव्य समजतो. असेही नंदूूकाका जगताप यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *