“या” घाटरस्तात दोन दिवसाचे अर्भक मिळाले.

Share now

Advertisement

लोणी काळभोर ःः शिदावणे (ता. हवेली) येथील घाटाच्या मध्यभागी एक स्त्री व पुरुष दोघेजण एका दुचाकीवरून आले होते घाट परिसरात आल्यावर महिलेने नवजात बालक रोडच्या कडेला ठेवून त्या ठिकाणावरुन निघून गेले. आसल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

Advertisement

       मिळालेल्या माहितीनुसार शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत शिंदवणे घाट परिसरात दोन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले आहे. त्या मुलीला ऊरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले. अज्ञात व्यक्तीवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार करीत आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *