भारतीय जैन संघटना व आरोग्य विभागाच्या मदतीने पुरंदर तालुक्यातील निरेत महा लसीकरण यशस्वी

Share now

Advertisement

पुरंदर(प्रतिनिधी अक्षय कोलते) पुरंदर तालुक्यातील निरा हे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर. आज या शहरात भारतीय जैन संघटना व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्येमाने महालसीकरण आयोजित केले होते. निरा गावातील व इतर भागातील लोकांनी या लसीकरणाचा चांगलाच फायदा घेतला. या महालसीकरणात 420 लोकांचे लसीकरण झाले आहे.

Advertisement


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे.कोविड मुक्त गाव अभियान भारतीय जैन संघटनेच्या मदतीने राबवले जात आहे. लोकांचे कोविड संदर्भात असलेले गैरसमज दूर करून लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.निरा येथील या महालसीकरणाला पुरंदर तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव यांनी भेट दिली. सुरुवातीला उदघाटन करून उपस्थित नागरिकांना लस घेण्याचे महत्त्व पटवून देऊन लसीकरणाला सुरुवात झाली.या उदघाटन प्रसंगी निरेचे सरपंच तेजश्री काकडे,ग्रामसेवक मनोज ढेरे, ग्रामपंचायत सदस्य अनंत शिंदे, विजय शिंदे, अभिजित भालेराव, पंचायत समिती माजी उपसभापती गोरखनाथ माने, पुरंदर तालुकाााा पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, डॉ बागुल सर, बापू भंडलकर,गणेश पारखे,उपस्थित होते.

Advertisement

यावेळी निरा आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी मोलाची मदत केली.यावेळी डॉ नरेश बागूळसर(प्रथम वैद्यकीय अधिकारी),डॉ. भागवत भिसे (द्वितीय वैद्यकीय अधिकारी), सत्यभामा म्हेत्रे आरोग्य सहाय्यीका,बापूसो भंडलकर आरोग्य सहाय्यक, गणेश पारसे आरोग्य सहाय्यक , बेबी तांबे आरोग्य सहाय्यीका,समीक्षा कांबळे समुदाय आरोग्य अधिकारी,अनिता नेवसे आरोग्य सेविका , शुभांगी चव्हाण,संगम कर्वे,मनीषा जाधव(प्रयोगशाळा वैज्ञानिक तंत्रज्ञा),शुभांगी रोकडे आशा सुपर वायझर,सचिन गायकवाड,सचिन ननावरे,सत्यम भोसले ,संगम कर्वे जागृती बारवकर आशा सेविका ,निशा पवार व सत्वशीला भंडगल इ कर्मचारी वर्गाने या लसीकरणासाठी मदत केली. भारतीय जैन संघटनेच्या तालुका प्रमुख तनुजा शहा, नवेंदू शहा ,सुदर्शन जैन,शैला शहा व तालुका समन्वयक अक्षय कोलते,उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *