केंद्रप्रमुखानी घेतली रिसॉर्टवर शिक्षण परिषद मद्यधुंद अवस्थेत एका शिक्षकाला शिवीगाळ केंद्रप्रमुख यांच्या वर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची कास्ट्राईब शिक्षक महासंघाची मागणी
वेल्हे ःः दापोडे (ता. वेल्हे) केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप राजगुरू यांनी केंद्रातील मागासवर्गीय शिक्षकाला अश्लील भाषेत जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली .याबाबत वेल्हा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून दिलीप राजगुरू या केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दिनांक १/१०/२०२१ दापोडे केंद्रातील “बालाजी रिसॉर्ट” येथे शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बाळासाहेब खरात उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा वांजळे यांना केंद्रप्रमुख दिलीप राजगुरू यांनी शिक्षण परिषदेमध्ये दारू पिऊन अश्लील भाषेत शिवीगाळ केली व अर्वाच्च शब्द वापरले त्यांची वर्तणूक केंद्रप्रमुख पदाला शोभणार नाही. त्यांनी जिल्हा परिषद सेवा व शर्ती चा भंग केलेला आहे. यापूर्वी केंद्रप्रमुख राजगुरू यांनी असे वर्तन केले आहे त्यामुळे त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या दोन वेतनवाढी कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. तरी राजगुरू यांची मनशिक स्थिती शासकीय सेवेत काम करणे योग्य वाटत नाही.
कोट………..असे काहीच घडले नाही ४० शिक्षक साक्षीला आहेत. वेळे संपल्यावर उशिरा मिटींग येऊन सारासवर करणे. माझी बदनामी करणेचा हा डाव आहे. दापोडे (ता. वेल्हे) केंद्रप्रमुख दिलीप राजगुरू यांनी सांगितले.
सदर प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून केंद्रप्रमुख आवर निलंबनाची कारवाई करावी तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांच्या वतीने राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी यांना दिले आहे.