पुरंदर तालुक्यातील निरा येथे होणार महा लसीकरण ःः आरोग्य विभाग व भारतीय जैन संघटनेच्या मदतीने

Share now

Advertisement

पुरंदर (प्रतिनिधी अक्षय कोलते)
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येऊ नये यासाठी भारतीय जैन संघटना आरोग्य विभागाला कोविड मुक्त गाव अभियाना अंतर्गत मदत करत आहे.लसीकरणा बरोबरच कोविड मुक्त होण्याच्या मार्गाने जाण्यासाठी कोविड मुक्त गाव अभियानात प्रत्येक गावाला सहभाग घेण्याचे आवाहन केले जात आहे.पुणे जिल्ह्यात कोविड मुक्त गाव अभियान सुरू आहे.

Advertisement


पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या निरा शहरात ४ ऑक्टोंबर २०२१ या दिवशी भारतीय जैन संघटना व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्येमाने महा लसीकरण होत आहे.या वेळी १८ वर्षापुढील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

Advertisement


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता कोविड मुक्त गाव अभियानात सहभाग घेऊन आपले गाव कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे.हे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र निरा याठिकाणी होणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *