बी. जी. देशमुख स्मरणार्थ व्याख्यानमाला २०२१ ( वर्ष दहावे)

Share now

Advertisement

पुणे (प्रतिनिधी) सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठiच्या) ‘सिम्बॉयसिस विधि महाविद्यालय पुणे” येथे दि. २८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी अकरा वाजता पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट (PCGT) यांच्या सहयोगाने ‘दहावे बी. .जी. देशमुख मेमोरियल ऑनलाईन व्याख्यानमाला’ संपन्न झाली. ‘पोलीस सुधारणा- जामीन कि कारागृह -काळाची गरज’ याविषयी कार्यक्रम झाला. सिम्बॉयसिस विधी महाविद्यालयाच्या संचालिका व विधी विभागाच्या अधिष्ठाता डॉ. शशिकला गुरपुर यांनी सर्वांचे स्वागत केले आणि सिम्बॉयसिस च्या व्यवस्थापन समितीकडून बी. जी. देशमुख सर आणि सिम्बॉयसिस चे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजुमदार यांचा दीर्घ काळाचा संबंध आणि संस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. बी जी देशमुख यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वातून विविध कल्पना कश्या रुजवल्या या बाबत खुलासा केला . तसेच त्यांनी पी. सी. जी.टी चे विशेषतः सामाजिक कामासाठी सिम्बॉयसिस विधी महाविद्यालै सोबतचे काम कसे आहे हे देखील नमूद केले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री. प्रकाश सिंग यांचेही स्वागत व कायदा आणि व्यवस्थापनामध्ये त्यांचे बलिदान व्यक्त केले.

Advertisement

श्री सतीश खोत पी. सी. जी. टी. चे व्हाईस चेअरमन यांनी संस्थेचा इतिहास, उद्दिष्टे, आणि भारतामध्ये चांगले राज्य येण्यासाठी त्यांचेकडून चे प्रयत्न , आत्तापर्यंत किती गोष्टी साध्य केल्या आहेत यावर भाष्य केले. नवीन पिढीने पी सी जी टी मध्ये सामील व्हावे असे आवाहन देखील केले. श्री. खोत यांनी सिम्बॉयसिस विधी महाविद्यालय ला सोबत घेउन भविष्यामध्ये कशा पद्धतीने एकत्र येऊन दोघांची ही उद्दिष्टे साध्य करू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले. श्री अजित निंबाळकर (निवृत्त सनदी अधिकारी आणि पी सी जी टी चे मेंबर) यांनी श्री बी जी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला श्री. देशमुख यांचे असामान्य व्यक्तिमत्व , खासगी क्षेत्रातील काम, सामाजिक न्याय आणि लिखाण याबद्दलच्या आठवणीं सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्रकाशसिंग (निवृत्त सनदी अधिकारी) यांनी सिंबायोसिस लॉ कॉलेजच्या जानेवारी ते जून 2019 मधील LEX CET या पुस्तकाचे अनावरण केले. श्री कृष्णन (निवृत्त सनदी अधिकारी आणि पी सी जी टी चे सदस्य) यांनी श्री प्रकाश सिंग यांची ओळख करून दिली आणि ‘पोलीस सुधारणा – जामीन कि काराग्रह’ या विषयाबद्धल माहिती दिली. श्री प्रकाश सिंग यांनी त्यांच्या भाषणामध्ये श्री बी जी देशमुख यांचे देशासाठी चे बलिदान व्यक्त केले आणि सध्याच्या पोलिस यंत्रणेतील त्रुटी आणि आव्हाने नमूद केली.

Advertisement

स्वातंत्र्यानंतर आजवरच्या प्रवासातील पोलिसांच्या रचनेतील सुधारणा हे एक अपूर्ण राहिलेले काम आहे अशी खंत व्यक्त केली. . पोलीस यंत्रणेवरील नको तितका दबाव, सेवा अटी मधील आवश्यक सुधारणा , विविध न्यायालयीन निवाडे, . त्यांनी पोलिसांचा यंत्रणा , सरकारी काम आणि नोकरशाही मधील अडचणी , आणि त्यावर गरजेची असणारी सुधारणा नमूद केली . सुधारणेसाठी आंतरराष्ट्रीय मापदंड वापरून पोलिस पुरुष आणि स्त्री पोलीस यांच्या भरतीमधील समानता ठेवण्याची गरज आहे असे नमूद केले. पोलिसांची शारीरिक आणि मानसिक अवस्था व्यवस्थित राहावी यासाठी ह्या यंत्रणेकडे सुधारणा व्हाव्यात असेही सांगितले.

Advertisement

भाषणाच्या शेवटी भारतामध्ये सर्वगुणसंपन्न अशी पोलीस यंत्रणा यावी आणि त्यांचेकडून कायद्याचे राज्य निर्माण व्हावे अशी आशा व्यक्त केली. महेश झगडे (निवृत्त सनदी अधिकारी आणि चेअरमन पीसीजीटी पुणे) यांनी त्यांच्या मनोगतामध्ये भारतातील तरुणांना पोलीसांमध्ये सुधारणा आणाव्यात म्हणून सहभागी होऊन राष्ट्रीय राष्ट्रउभारणीसाठी पुढे यावे अशी विनंती केली. भाषणाची सांगता प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाने झाली. श्री सतीश खोत (व्हाईस चेअरमन , पी सी जी टी ) यांनी प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन केले. डॉ. अपराजिता मोहंती (उपसंचालिका, सिम्बॉयसिस विधी महाविद्यालय , पुणे ) यांनी आभार यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ लास्या व्याकरणम यांनी केले

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *