गारवा हॉटेलच्या मालकाच्या खून प्रकरणात आटक केलेल्या महिला आरोपीस जामीन मंजूर

Share now

Advertisement

पुणे ःः उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गारवा हॉटेलच्या मालकाच्या खून प्रकरणात आटक केलेल्या आरोपी काजल चंद्रकांत कोकणे या महिलेस न्यायालयाने १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.

Advertisement


    आरोपी महिलेचा या गुन्ह्याच्या टोळीशी काहीही संबंध नसून, आरोपीला खोट्या गुन्हयात अडकवण्यात आले आहे. आरोपी महिला ही आठ महिन्यांची गरोदर आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला. 

Advertisement


     गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे हे हॉटेलसमोर बोलत असताना अचानकपणे एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. त्यांना रूग्णालय दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. तपासादरम्यान बाळासाहेब खेडेकर आणि निखिल खेडेकर यांना अटक करण्यात आली होती. 

Advertisement


तपासामध्ये आरोपींनी निलेश मधुकर आरते याला सुपारी देऊन खून घडवून आल्याचे निष्पन्न झाले होते. हा खून हॉटेल व्यवसायाच्या स्पर्धेतून झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकूण दहा आरोपींना अटक केली होती. त्यापैकी प्रमुख आरोपी निलेश आरते याची पत्नी काजल चंद्रकांत कोकणे हिला 27 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तिच्यावर शस्त्र लपविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement


        बचाव पक्षाच्य्या युक्तिवादासाठी ॲड. सचिन झालटे पाटील व ॲड. कल्पेश राम आढाव यांच्यामार्फत तिने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *