दिवे घाटात टेम्पोला आग राहुल शेवाळे यांनी दाखवली कार्यतत्परता

Share now


Advertisement

सासवड (प्रतिनिधी) दिवे घाटातून भरधाव वेगाने जात असलेल्या टेम्पोच्या डिझेल टाकीला आग लागली हे लक्षात आल्याने ती वाढू नये यासाठी टेम्पोचा चालक मदतीसाठी येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मदतीची याचना करीत असताना कोणीही त्याला मदत करायला थांबत नव्हते. या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे हे भरघाव वेगाने प्रवास करत असताना दिवे घाटात त्यांच्या निदर्शनास हि परिस्थिती आल्यानंतर त्यानी लगेच आपल्या गाडी थांबून आपल्या गाडीतील पिण्याच्या पाण्याचे दोन बॉक्स काढून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले व त्यांच्या मदतीमुळे टेम्पोला लागलेली  आग वाढण्या अगोदर नियंत्रणात आली. * व्हिडिओ खाली पहा*

Advertisement


         या टेम्पो मध्ये शेतीला लागणारी खते व लाखो रुपयांची औषधे होती . वेळीच मदत झाल्यामुळे आग विझली अन्यथ टेम्पो जळून खाक झाला असता व लाखो रुपयांचे नुकसान झाले असते.

Advertisement


       अशा परिस्थितीत वेळेला मदत मिळणे खुप महत्वाचे असते हे या अनुभवातून सिध्द झाले या बाबत टेम्पो चालकाने राहुलदादा शेवाळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *