पारगाव रेल्वे पुलाचे काम सुरु होणार ःः शिवाजी कोलते यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला यश

Share now


Advertisement

सासवड (प्रतिनिधी)  पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातून जात असलेल्या मिरज, कोल्हापूर, पुणे या रेल्वे लाईन वरील पारगाव रेल्वे गेटच्या पुलाचे काम गेल्या अनेक दिवसापासून बंद होते. ते काम सुरू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कोलते यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या धर्तीवर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आज पाहणी केली. असल्याची माहिती समोर येत आहे.

Advertisement


       पारगाव (ता पुरंदर) येथील रेल्वे अंडरपास चे काम रखडल्यामुळे पिसर्वे, नायगाव, राजुरी, रीसे, पीसे, या भागाचे दळण वळण हे पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यामुळे शेतीमाल व शालेय विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कोलते यांनी श्री गणेशा महाआरती करणार असल्याचे जाहीर केले होते. याची दखल घेत रेल्वेचे अधिकारी त्रिपाठी यांनी नुकतीच रेल्वेच्या अंडर पासच्या पुलाला भेट देऊन येथील समस्या जाणून घेऊन नवीन ठेकेदार या कामासाठी नियुक्त केला असल्याचे देखील समोर येत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *