पुरंदर तालुक्याच्या “या” नेत्याची चारचाकी आलिशान गाडी अज्ञातांनी दिली पेटवुन
सासवड (प्रतिनिधी) काल रात्री सिंगापुर या ठिकाणी कॉंग्रेसची आढावा बैठक संपल्या नंतर जेवन करुन विकास इंदलकर हे आपल्या घरी ११:३० वा.गेले. त्यानंतर १२:१५ ते १२:३० च्या दरम्याण गाडी पेटल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर शेजारी असलेल्या बोअरवेलच्या सहाय्याने आग विझवण्यात यश आले आहे. परंतु गाडीचे खुप मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
वाघापुर (ता. पुरंदर) पुरंदर तालुका युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष विकास इंदलकर यांची गाडी नं एम एच १२ :: जे यु ०००५ चार चाकी आलिशान गाडी रात्री अज्ञाताने पेटवुन दिल्याची घटना घडली आहे.
गाडीशेजारी पेट्रोलची बाटली तसेच काडीपेटी सापडली असुन प्रथम गाडीच्या टायरवर पेट्रोल टाकुन टायर पेटवण्यात आल्यामुळे गाडीला भिषण आग लागल्याचे विकास इंदलकर यांनी सांगीतले.
घटनेची माहिती मिळताच पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. विकास इंदलकर यांनी याबाबत जेजुरी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असुन पुढील तपास सपोनि गावडे करित आहेत.